इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरीत काँग्रेसची निदर्शने; मनसेने जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखला

164

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज  (सोमवार) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.  तर पिंपरीतील आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तर मनसेने जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी महापालिकेसमोर जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली ग्रेडसेपरेटरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान, या बंदचा शहरातील दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम दिसून आला नाही. सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. तर पीएमपी बस सेवाही सुरू होती.