इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाही – रविशंकर प्रसाद

146

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाही, तर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. येथे घेतलेल्या  पत्रकार परिषदेत त्यांनी इंधन दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत, असे सांगितले.

तसेच ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आज जो बंद पुकारला आहे, त्यात देशाचे नुकसान होतो आहे. बिहारमध्ये अँब्युलन्समध्ये एक मुलगा अडकल्याने मरण पावला. बसेस जाळल्या जात आहेत. पेट्रोल पंपांची तोडफोड केली जाते आहे, या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार?  असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे