इंद्रायणी थंडी २०२० च्या नृत्य स्पर्धेत रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

267

भोसरी,दि.३(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंच यांच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य महिला सक्षमीकरण असून या जत्रे मध्ये विविध कार्यक्रमांचे आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होते.

इंद्रायणी थडी २०२० मध्ये पारंपरिक आणि लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील सांघिक लोकनृत्य स्पर्धेत आकुर्डीच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाने “स्त्रीशक्तीचा जागर” हे लोकनृत्य सादर करीत प्रथम पारितोषिक पटकावले. या नृत्या मध्ये १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, या विद्यार्थ्यांना डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी मार्गदर्शन केले.

या सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी महाराष्ट्रातील विविध परंपरांचे आणि संस्कृतीचे दर्शन यावेळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले.

दरम्यान, या पारितोषकांचे वितरण आमदार महेश लांडगे आणि भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsAppShare