इंद्रायणीनगर, बालाजीनगरमध्ये नालेसफाई

112

भोसरी, दि. १५ (पीसीबी) –  पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेच्या वतीने नाला सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. इंद्रायणीनगर, बालाजीनगरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये आज (बुधवार) नाला सफाई करण्यात आली. याबाबत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी संबंधित विभागाला सुचना केल्या होत्या.

बालाजीनगरातील प्रभाग क्रमांक ८ मधील नाल्यामध्ये कचरा साचला होता. तसेच जलपर्णी वाढली होते. यामुळे डासांची पैदास होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नाल्यामध्ये पाणी साचून दुर्गधी पसरली होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत होता.

नाल्यात राडारोडा साठून राहिल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून राहते. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेच्या वतीने नाला सफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज प्रभाग क्रमांक ८ मधील नाल्याची जेसीबीच्या साहाय्याने नालेसफाई करण्यात आली.