इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा

258

पुणे, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आमदाराने राजीनामा दिला आहे. इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला राजीनामा दिला आहे.

दरम्यान, आतापर्यत अनेक मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामे दिले आहेत. शिवसेना १, राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा दिला आहे. तसेच भाजपच्या २ आमदारांनी राजीनाम्याचे पत्र मराठा मोर्चेकऱ्यांकडे दिले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत राज्यातील ६ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा स्वीकारता येणार नाही, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.