इंडोनेशियातील भूकंपात ८२ जणांचा मृत्यू; १०० जण जखमी

85

जकार्ता, दि. ६ (पीसीबी) – इंडोनेशिया देशातील लोम्बोक बेटाला येथील भूकंपाच्या जोरदार धक्क्यात ८२ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.९रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातल्या जमिनीच्या १०.५ किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बाली द्विपसमूहापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले असून या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरात त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक तसंच पर्यटकांमध्ये भीतीचं वातावारण निर्माण झाले होते. परंतु त्सुनामीचा धोका टळला असल्याचे तेथील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.