इंडिगो विमानात श्वसनाचा त्रास झाल्याने चार महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

204

बंगळुरु, दि. १ (पीसीबी) – बंगळुरू येथून पाटणाला जाणाऱ्या एका विमानात श्वसनाचा त्रास झाल्याने एका चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास इंडिगो ६ ई ८९७ या विमानात घडली.

पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास इंडिगो ६ ई ८९७ या विमानातून एका चार महिन्याचे बाळ त्याच्या आई-वडिलांसोबत प्रवास करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास विमानातील कर्मचाऱ्यांना बाळाची प्रकृती बिघडल्याचे समजले. विमानातील डॉक्टर बाळाची काळजी घेत होते. त्यानंतर तातडीने विमान हैदराबाद येथे वळवण्यात आले. तोपर्यंत विमानतळावर रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्याचे आवाहन करण्यात आले होते.  तेथून बाळाला खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.