इंटरनेट फुकट देणार असाल,  तर मग रेशनही फुकट द्या – उध्दव ठाकरे

81

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – डिजिटल इंडियामुळे नागरिकांची पोट भरणार नाहीत. त्यासाठी फोनवर दाखवण्यासाठी नव्हे, तर ताटातही असायला पाहिजे. इंटरनेट फुकट देणार असाल,   तर मग रेशनही फुकट द्या,  असा उपरोधिक  सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीला अप्रत्यक्षरित्या दिला.

मुंबईत आज (शनिवार)  केबल मालक संघटनांच्या आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.