इंग्लंडमध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी; बीसीसीआय विराट कोहली, रवी शास्त्रीची चौकशी करणार ?

216

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या दोन कसोटी  सामन्यात भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच  तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआय कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री  यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रक आणि सराव सामन्यांच्या अभावाबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली होती. यानंतर खेळाडूंशी चर्चा करुन इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेआधी मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी आम्हाला तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही, हे कारण आता भारतीय खेळाडूंना सांगता येणार नाही.

रवी शास्त्री, विराट कोहली यांना संघनिवडीबद्दल मिळणाऱ्या विशेष अधिकारांमध्येही कपात केली जाण्याची शक्यता आहे.  त्यातबरोबर   सहायक प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चौकशी केली जाणार आहे.   भारतीय खेळाडूंच्या स्लिपमध्ये झेल सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ५० झेल सोडले आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.