आसाराम बापूला झटका; बलात्कारप्रकरणी हायकोर्टाने फेटाळली याचिका

127

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला राजस्थान हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी यासाठी आसारामने दाखल केलेली याचिका राजस्थान हायकोर्टाच्या जोधपूर खंडपीठाने सोमवारी (दि.२३) फेटाळून लावली. आसारामकडून दाखल करण्यात आलेली अशा प्रकारची याचिका कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळली. न्या. संदीप मेहता आणि न्या. विनीत कुमार यांनी हा निर्णय दिला.

दरम्यान, सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आसारामकडून आणखी एक याचिका राजस्थान हायकोर्टात दाखल केली आहे. यावर पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी विशेष एससी-एसटी कोर्टाने गेल्या वर्षी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

लैंगिक अत्याचारप्रकरणी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आसारामला अटक करण्यात आली होती. आध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी या मुलीने आसारामच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात प्रवेश घेतला होता. दरम्यान, या मुलीच्या तक्रारीनुसार, आसारामने तिला जोधपूरमधील मनाई भागातील आपल्या आश्रमात बोलावून घेतले होते तसेच तिथे तिच्यावर १५ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री बलात्कार केला होता.

WhatsAppShare