आसाममध्ये नागरिकत्वाच्या यादीतून माजी राष्ट्रपतींचे कुटुंब गायब   

52

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) ने जाहीर केलेल्या यादीत आसाममधील ४० लाख नागरिक अवैध ठरले आहेत. धक्कादायक म्हणजे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावेच या यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. तर उल्फा या अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे  आश्चर्य व्यक्त केले जात आहे.