आशियाई स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा विजय

102

जकार्ता, दि. २२ (पीसीबी) – दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने बुधवारी आजवरचा सर्वात मोठी विजय नोंदवला. भारताने ८६ वर्षे जुना विक्रम मोडीत काढली. भारतीय पुरुषांच्या संघाने हाँगकाँगचा २६-० ने पराभव केला. यापूर्वी भारताने १९३२ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा २४-१ ने पराभव केला होता. भारताच्या रुपिंदर पाल सिंग, हरमनप्रित सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी ४-४ गोल केले. तर आकाशदीप सिंहने ३ आणि वरुण कुमार-मनप्रित सिंग यांनी २-२ तर सुनील आणि विवेक सागरने १-१ गोल केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले. या प्रकारातील हे भारताचे पहिलेच सुवर्ण आहे. यासोबतच तो या प्रकारात एशियाड सुवर्ण जिंकणारा भारताचा पहिला नेमबाज व सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

सौरभने फायनलमध्ये २०१० चा विश्वविजेता ४२ वर्षीय जपानचा नेमबाज तोमोयुकी मत्सुदाला हरवले. २४ राउंडच्या फायनलमध्ये २२ राउंडपर्यंत मत्सुदा सौरभच्या पुढे होता. शेवटच्या दोन राउंडमध्ये सौरभने बाजी उलटवली.