आशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव  

123

जकार्ता, दि. १९ (पीसीबी) – ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा  कुस्तीपटू सुशील कुमार आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात बहरीनच्या एडम बातिरोव्हकडून पराभूत झाला .  

आजच्या सामन्यावेळी सुरुवातीला सुशील कुमारने २-१ अशी आघाडी घेतली होती. परंतु, बहरिनच्या कुस्तीपटूने सामन्यात जोरदार पुनरागमन करीत सुशील कुमारवर ३-५ अशी मात केली.

बतिरोव्हला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे सुशील कुमारचे या स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, हा खेळाचाच भाग आहे. आता मला माझ्या पुढील लक्ष्यावर फोकस करायला हवा. तसेच मला तीन मिनिटानंतर अटॅक करायला हवा होता, असे सुशीलकुमार  म्हणाला.