आशियाई क्रीडा स्पर्धा; स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकलला कांस्यपदक

29

जकार्ता, दि. २५ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने स्क्वॅशमध्ये पदक पटकावले आहे. दिपीका पल्लिकलला उपांत्य सामन्यात मलेशियाच्या निकोल अॅन डेव्हिडकडून पराभव स्वीकारावा लागला. निकोलने दिपीकावर ७-११, ९-११, ६-११ अशा ३ सरळ सेट्समध्ये मात केली. दिपीकाचे आशियाई खेळांमधील हे तिसरे पदक ठरले आहे. २०१४ साली झालेल्या एशियाड स्पर्धेत दिपीकाने सांघिक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसरीकडे भारताच्या जोशना चिनप्पालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यमने जोशनाचा पराभव केला.

याव्यतिरीक्त अॅथलेटिक्समध्ये भारताच्या मोहम्मद अनसने ४०० मी. शर्यतीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली  आहे. याचसोबत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी किती पदकांची भर पडणार याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे.