आशियाई क्रीडा स्पर्धा; स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकलला कांस्यपदक

77

जकार्ता, दि. २५ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने स्क्वॅशमध्ये पदक पटकावले आहे. दिपीका पल्लिकलला उपांत्य सामन्यात मलेशियाच्या निकोल अॅन डेव्हिडकडून पराभव स्वीकारावा लागला. निकोलने दिपीकावर ७-११, ९-११, ६-११ अशा ३ सरळ सेट्समध्ये मात केली. दिपीकाचे आशियाई खेळांमधील हे तिसरे पदक ठरले आहे. २०१४ साली झालेल्या एशियाड स्पर्धेत दिपीकाने सांघिक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसरीकडे भारताच्या जोशना चिनप्पालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यमने जोशनाचा पराभव केला.