आशियाई क्रीडा स्पर्धा; सलग ७ सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय कबड्डी  संघाला कास्यपदक  

208

जकार्ता, दि. २३ (पीसीबी) – भारतीय पुरुष कबड्डी संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग आठवे सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. उपांत्य सामन्यात इराणने भारताचा २७-१८ असा दारूण पराभव केला. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

सुरुवातीला भारताने ६-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, इराणने दुसऱ्या सत्रात  खेळावर वर्चस्व मिळवत भारताचे विजयाचे मनसुबे धुळीस मिळवले. या स्पर्धेच्या इतिहासात कबड्डीची अंतिम फेरी न गाठण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली. १९९० पासून सात एशियाडमध्ये भारताने कबड्डीत सुवर्णपदक पटकावले आहे.

दुसऱ्या सत्रामधील बाराव्या मिनिटानंतर इराणने भारतावर १७-१३ ची आघाडी घेतली. यानंतर भारताला पुनरागमनाची संधी न देता इराणने विजय नोंदवला.

फायनलमध्ये इराणचा सामना आता दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे. दक्षिण कोरियाने पाकिस्तानवर मात केली होती. भारताला आता कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.