आशियाई क्रीडा स्पर्धा; भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक

92

जकार्ता, दि. २७ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने  सुवर्णपदक पटकावले. नीरजने याआधी जागतिक ज्युनियर अॅथलेटिक्स आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे.

नीरजने पहिल्या प्रयत्नात ८३.४६ मीटर अंतरावर भालाफेक केली. मग तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८८.०६ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. याच कामगिरीच्या जोरावर त्यांने  सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

चीनच्या लिउ किजेन याने ८२.२२ मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर नाव कोरले. तर पाकिस्तानच्या अलशद नदीमने ८०.७५ मीटर भालाफेक करत कांस्य पदक  पटकावले .