आशियाई क्रीडा स्पर्धा; बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक

75

जकार्ता, दि. २७ (पीसीबी) –  आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव केला. १९६२ नंतर भारतीय महिला बॅडमिंटनपटूने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, १५-२१, २१-१० असा पराभव केला. सिंधूला या विजयासाठी शेवटच्या सेटपर्यंत संघर्ष करावा लागला. या विजयामुळे  भारताचे किमान रौप्यपदक निश्चित असल्याचे बोलले जात आहे. अंतिम फेरीत सिंधू चीनच्या ताई त्झु यिंगशी लढत देणार आहे.

पी. व्ही. सिंधूने दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडच्याच निपॉन जिंदापॉलचे आव्हान २१-११, १६-२१, २१-१४ असे मोडीत काढले. दरम्यान, चीनच्या ताई त्झु यिंगने उपांत्य फेरीत भारताच्या सायना नेहवालवर सलग दोन सेट्समध्ये मात करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे सायनाला कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.