आशियाई क्रीडा स्पर्धा; नेमबाजीत भारताच्या सौरभ चौधरीला सुवर्णपदक

70

जकार्ता, दि. २१ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत  सलग तिसऱ्या दिवशीही  भारतीय खेळाडूंचे पदक मिळवून देण्याचे काम सुरू  आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदक  पटकावले आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तर याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळाले आहे.