आशियाई क्रीडा स्पर्धा; तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहला सुवर्णपदक

100

जकार्ता, दि. २९ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली आहे. तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे दहावे सुवर्णपदक  आहे.  तर आजच्या दिवसातील हे पहिले सुवर्णपदक आहे.

याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र, पदकांच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यात त्याला यश आले नाही. मात्र, अरपिंदरने पहिल्या प्रयत्नापासून सर्वोत्तम कामगिरी करत आपले अव्वल स्थान कायम ठेवले. सहा प्रयत्नांमध्ये एकाही खेळाडूने अरपिंदरच्या प्रयत्नांना टक्कर दिली नाही.