आशियाई क्रीडा स्पर्धा; गोळाफेकीत भारताच्या तेजिंदरपालसिंगला सुवर्णपदक

86

जकार्ता, दि. २६ (पीसीबी) – भारताच्या तेजिंदरपालसिंग तूरने नव्या स्पर्धाविक्रमासह जकार्तामध्ये सुरू असलेल्या  आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकीत सुवर्ण पदक पटकावले.  तेजपालने गोळाफेकीच्या पाचव्या प्रयत्नात २०.७५ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

त्याने ओमप्रकारश करहानाचा २०.६९ मीटरचा विक्रम मोडीत काढला. तेजिंदरपालने गेल्या वर्षी २०.२४ मीटरवर गोळाफेक केली होती. याच कामगिरीमुळे त्याच्याकडून  अपेक्षा वाढल्या   होत्या. तेजिंदरपालने जकार्तात आपली कामगिरी आणखी उंचावून  सुवर्णपदकावर आपले नांव कोरले.

स्पर्धेच्या  सातव्या दिवशी भारताचे संमिश्र प्रदर्शन दिसून आले. भारताला स्क्वॉशमध्ये तीन कांस्य पदक आणि एक सुपर्ण पदक मिळाले. भारत अंकतालिकेत आतापर्यंत २९ पदकांसह आठव्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.