आशियाई क्रीडा स्पर्धा; कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी विनेश फोगाट पहिली महिला  

170

जकार्ता, दि. २० (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव केला. या विजयामुळे विनेशला आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडूचा मान मिळाला आहे.

पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, तरीही तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

दरम्यान, आज (सोमवार) नेमबाजीमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक ठरले आहे. आज सकाळी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती.