आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर राम कदम संतापले

172

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ‘हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे,’ आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानावर भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे. कदम म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केले, ते अतिशय दुर्दैवी आहे. मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी त्यांनी जे वक्तव्य केले, त्यातून केवळ हिंदू धर्म नव्हे, तर मुस्लिम समाजसोडून ज्या-ज्या धर्मामध्ये अंत्यविधी दफनविधीचा होत नाही, त्या धर्मांचा अपमान केला आहे, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना कदम म्हणाले, ‘आव्हाडांनी समस्त हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे. वक्तव्य मागे घेतले पाहिजे, अशी मागणी कदम यांनी यावेळी बोलताना केली. दरम्यान कदम यांच्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsAppShare