आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या

800

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – आळंदी नगरपरिषदेच्या भाजप नगरसेवकावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज (मंगळवार) पुणे-आळंदी रोडवर चऱ्होली येथे दुपारी चारच्या सुमारास घडली.

बालाजी कांबळे असे मयत नगरसेवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चारच्या सुमारास भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी  वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  दिघी पोलीस तपास करत आहेत.