आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक

725

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे याच्या हत्येप्रकरणी दिघी पोलिसांनी आज (बुधवार) पहाटे चौघांना अटक केली आहे.

याप्रकरणी कृष्णा राजकुमार घोलप यांनी कांबळे यांचे मावस भाऊ अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, पुणे) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार  दिघी पोलिसांनी अजय मेटकरी, प्रफुल्ल गबाले, राज खेडकर आणि संतोष माने या चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीमध्ये आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात कांबळे यांचा मावस भाऊ संजय याने त्यांच्याशी शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली होती. भांडणानंतर वारंवार मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे त्यानेच कांबळे यांचा खून केल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार दिघी पोलिसांनी आज (बुधवार) अजय मेटकरी, प्रफुल्ल गबाले, राज खेडकर आणि संतोष माने यांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास आहेत.