आळंदीत हप्ता देत नाही म्हणून स्क्रॅप व्यापाऱ्याला मारहाण करुन ट्रकची कोयत्याने तोडफोड

1014

आळंदी, दि. २६ (पीसीबी) –  तिघा टोळक्यांनी हप्ता देत नाही म्हणून एका स्क्रॅप व्यापाऱ्याला मारहाण करुन ट्रकची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी (दि.२५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आळंदी पोलिस ठाणे हद्दीत घडली.

राम विठ्ठल पवार (वय ३८, रा. हनुमान मंदिराजवळ, त्रिवेनीनगर, निगडी) असे मारहाण झालेल्या स्क्रॅप व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सागर लोखंडे, अक्षय लोखंडे (दोघे.रा. मरकळ, आळंदी) आणि एका अनोळखी साथीदाराविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी राम पवार हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये काही स्क्रॅपचे मटेरियल घेऊन निघाले होते. यावेळी आरोपी सागर, अक्षय आणि एक अनोळखी तरुणाने ट्रकच्या आडवी दुचाकीलावून ट्रक थांबवला. आरोपींनी कोयत्याने वार करुन ट्रकची काच फोडली. तसेच राम पवार यांना लाथा बुक्कयांनी जबर मारहाण करुण पुन्हा तेथून स्क्रॅपचे मटेरियल न उलण्याची धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलिस तपास करत आहेत.