आळंदीत वडापमधून प्रवास करणाऱ्या महिलेवर बलात्कार

58

आळंदी, दि. १६ (पीसीबी) – एका ३२ वर्षीय प्रवासी महिलेला चाकूचा धाक दाखवून ओमिनी कारचालकाने निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास आळंदी फाट्याजवळील तळ्याशेजारी घडली.