आळंदीत कोयत्याचा धाक दाखवून भजी विक्रेत्यास जबर मारहाण करुन लुटले; आरोपीस अटक

463

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – भजी लवकर देत नाही म्हणून एका टवाळखोराने कोयत्याचा धाक दाखवून भजी विक्रेत्याला जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या गल्ल्यातील २ हजार रुपये जबरदस्तीने हिस्कावून मारहाण करत त्याच्या दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून परिसरात दहशत पसरवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२२) सकाळी सव्वादहाच्या सुमारास आळंदी चाकण चौकातील, आळंदी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेत असलेल्या राम भरोसे वडापाव सेंटरवर घडली.

दिग्या उर्फ दिगंबर विठ्ठल कदम (वय २९, रा. गोपाळपुरा, आळंदी) असे कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जखमी राम भरोसे वडापाव सेंटरचे मालक बाळासाहेब रामचंद्र वायकुळे (वय ४७, रा. परशुराम बाबानगर, केळगाव, आळंदी) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्यादी आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब वायकुळे यांचे आळंदी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेत राम भरोसे नावाचे वडापाव सेंटर आहे. बुधवारी सकाळी दाहाच्या सुमारास आरोपी दिग्या हा वायकुळे यांच्या वडापाव सेंटरवर आला होता. त्याने वायकुळे यांना आरेरावीच्या भाषेत दोन प्लेट भजी बांधून देण्यास सांगितले. वायकुळे यांनी भजी बनवण्यास थोडा वेळ लागेल असे सांगितले. मात्र अस बोलल्याने दिग्या संतापला आणि त्यांने त्याकडील कोयत्याचा धाक दाखवून वायकुळे यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील २ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावले तसेच वायकुळे यांच्या वडापाव सेंटरमधील साहित्या रस्त्यावर फेकून त्यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच बाजारातील दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास धमकावले. पोलिसांनी दिग्या कमद याला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक उध्दव खाडे तपास करत आहेत.