आळंदीत अकरा महिन्याच्या चिमुरड्याने रिमोटचा सेल गिळला

242

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – येथील अकरा महिन्याच्या चिमुरड्याने रिमोटचा सेल गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घडना घडली.

हुजैफ तांबोळी असे या चिमुरड्याचे नाव आहे. हुजैफला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

तांबोळी कुटुंब आळंदी येथे राहत असून हुजैफने खेळताना टेबलावर ठेवलेला रिमोट घेतला. काही वेळाने त्याने तो रिमोट जमिनीवर आपटला. त्यानंतर हुजैफने जमिनीवर पडलेला सेल उचलून गिळून टाकला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्बिणीच्या साह्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन हा सेल बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.