आळंदीतील नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

139

दिघी, दि. ३० (पीसीबी) – आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी आणखी एकाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. विजय चिखले (वय २१, रा. दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणात संतोष माने,  प्रफुल्ल गबाले आणि अण्य तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. यामुळे लवकरच या खूनाचा उलगडा करण्यात येईल असे पोलिसांनी म्हणटले आहे.  शक्यता वत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२६) काही अज्ञात हल्लेखोरांनी नगरसेवक कांबळे यांचा कोत्याने वार करुन खून केला होता. याप्रकरणी कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलिसात फिर्याद दिली होती. या फिर्यादीमध्ये दोन महिन्यांपूर्वी देहूफाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीमध्ये आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी  कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात एका व्यक्तिशी वाद व झटापट होऊन, शिवीगाळ करत मारहाणीची घटना घडली होती. भांडणानंतर बालाजी कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती, असे कृष्णा राजकुमार घोलप यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन माने, गबाले, चिखले आणि अण्य तीन अल्पवयीन मुलांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे.  दिघी पोलीस  तपास करत आहेत.