आळंदीतील इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला वृध्द वारकरी वाहून गेला; शोध कार्य सुरु

243

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला एक वृद्ध वारकरी वाहून गेल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.२७) सकाळी सातच्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर घडली.

वसंत लहाने (वय ५५, रा.घुंडरे गल्ली, आळंदी देवाची) असे इंद्रायणी नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत लहाने हे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेले होते. नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचा तोल जाऊन ते नदीत वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत आळंदी घाटापासुन ते चऱ्होली बंधाऱ्यापर्यंत शोध मोहिम राबविली. मात्र लहाने यांना शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले नाही. आज शुक्रवार सकाळ पासून शोधमोहीम पुन्हा सुरु करण्यात आली आहे.