आळंदीतील इंद्रायणी नदीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन

323

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी आळंदीतील इंद्रायणी नदीत आज (गुरुवारी) विसर्जित करण्यात आल्या.  पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते अस्थींचे विधीवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. 

तत्पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांनी दिंडी काढून मिरवणुकीने आळंदीत अस्थीकलश इंद्रायणी नदीवर आणण्यात आला. यावेळी उपस्थितीतांनी अटलबिहारी यांना श्रद्धांजली वाहली.  आणि अस्थीवर पुष्प अर्पण केले.

पसायदान घेतल्यानंतर वाजपेयी यांचे अस्थींचे इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आले. यावेळी शांतिब्रम्ह मारोतीबुवा महाराज कुरेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ  बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे,आदी उपस्थित होते