आर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे- राज ठाकरे

31

पुणे, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य हे उद्योगधंद्यात कायम अग्रेसर होते. आजही उद्योगधंदा उभा करायचा असल्यास प्रथम महाराष्ट्राला पसंती मिळते. उद्योगधंद्यात मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याने आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. मराठी मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज राहणार नाही. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले. ते मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत होते.