आर्थिक कारणांसाठी विवाहितेचा छळ करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

78

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) : सासरच्या लोकांनी आर्थिक कारणांसाठी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने विवाहितेवर नैसर्गिकरीत्या लैंगिक अत्याचार केला. याबाबत पतीसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नऊ डिसेंबर 2020 पासून 22 जून 2021 या कालावधीत विठ्ठलनगर नेहरुनगर पिंपरी येथे घडली.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती याने विवाहितेकडे घर आणि व्यवसायासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने आरोपींनी वेळोवेळी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी पतीने विवाहितेसोबत नैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare