आरपीआय वाहतुक आघाडी आणि हमीदभाई शेख युवा मंचाच्या वतीने मंगल परियण सोहळा

73

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) – पिंपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक येथे आर पी आय वाहतुक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजीज शेख आणि हमीदभाई शेख युवा मंचाच्या वतीने लॉकडाऊन दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत मंगल परियणच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, आर पी आय वाहतुक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजीज शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थित हा मंगल परियण कार्यक्रमाचा सोहळा उत्साहात पार पडला.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून हमीदभाई युवा मंचाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात असून हातावरचे पोट असणाऱ्या ३००० गरजू कुटुंबांना रोज जेवण दिले जाते, असे आरपीआय वाहतुक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी सांगितले.

WhatsAppShare