आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा – छगन भुजबळ

94

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आरक्षण संपवणे हा सरकाचा डाव आहे, हा डाव यशस्वी होऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी भुजबळ बोलत होते.  

यावेळी भुजबळ म्हणाले की, कुणालाही न घाबरता लोकांच्या मदतीसाठी उभे राहा, स्वतःला झोकून द्या. अनेक आंदोलनांमध्ये मलाही अटक झाली पण मी डगमगलो नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. दर वेळी कायदा हातात घेतला पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले

हिंमत हरू नका म्हणत भुजबळ म्हटले, ”कश्ती तो उनकी डुबती हैं जिनके इमान डगमगाते हैं जिनके दिलमें नेकी होती है उनके आगे मंजिलेभी सर झुकाती है” आंदोलन करण्याच्या आधी डगमगून जाऊ नका. तुरुंगात गेलो तर सोडवतील कसे याची चिंता बाळगू नका लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडा तर लोक तुम्हाला साथ देतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.