आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना

28

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा,’ असा सल्ला शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजप सरकारला दिला आहे.