आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन

68

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज (सोमवार) राज्यभरात आंदोलन करणार आहे. अमरावती-नागपूर महामार्ग आणि मनमाडमध्ये धनगर बांधव शेळ्यामेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. औरंगाबाद, जळगावमध्ये रास्ता रोको तर जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापुरात गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही धरणे आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.