आरओव्ही-दक्ष पुणे पोलिस ताफ्यात दाखल

117

पुणे, दि. ११ (पीसीबी) – आरओव्ही-दक्ष हा बॉम्ब निकामी करणारा अत्याधुनिक रोबो पुणे पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आरओव्ही- दक्ष रिमोटवर चालणारा रोबो असून त्याद्वारे बॉम्ब निकामी करता येणार आहे.

पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॉम्ब स्फोटाची प्रकरणे समोर आल्याने पुणे पोलिसांना हा रोबो एक वरदान ठरणार आहे.  डिआरडीओने आरओव्ही – दक्ष हा रोबो भारतीय सेनेसाठी विकसीत केला होता. हा रोबो पुढील सहा महिने पुणे पोलिसांकडे असणार असल्याने त्याचा मोठा फायदा पुणे पोलिसांना होणार आहे.