आयटीच्या मित्रांनो आयुष्य वाया घालवू नका; असे लिहून त्याने आत्महत्या केली!

75

हैदराबाद, दि ६ (पीसीबी) – आयुष्य एकदाच मिळतं असत आपण ते आयटी क्षेत्रात असच फुकट वाया घालवू नका अशी चिठ्ठी लिहून एक विद्यार्थाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मार्क ऍण्ड्रयू चार्ल्स असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हैदराबादमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) मास्टर्स इन डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता.

परिक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने तसेच नोकरी न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचं मार्कने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.