आम आदमी पार्टीच्या वतीने गरजूंना मोफत जेवण वाटप

49

पिंपरी, दि. 20 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले.आज पहिल्यांदा सावली निवारा केंद्रात भेट देण्याचा योग आला,केंद्राचे प्रबंधक श्री गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून त्यांचा अभिमान वाटला.एक चित्रकार तर एक गायक अस बोलतांना आप पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले
आज च्या जेवण वाटप अभियानाचा श्रेय श्री नंदूजी नारंग यांना जातो.

तसेच श्री किशोर जगताप यांच्या सहयोगाने आज कार्यक्रम सुखरूप पार पाडण्यात आला अस आप पिंपरी चिंचवड महिला विंग अध्यक्षा स्मिता पवार म्हटल्या या प्रसंगी यशवंत कांबळे अध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पिंपरी चिंचवड, नंदूजी नारंग अध्यक्ष आप पिंपरी विधान सभा,माधुरी गायकवाड उपाध्यक्ष आप महिला विंग पिंपरी चिंचवड, वैजनाथ शिरसट आप शहर समिती सदस्य,किशोर जगताप सचिव आप पिंपरी चिंचवड, वहाब शेख अध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पुणे जिल्हा,मुकेश रंजन उपाध्यक्ष आप पिंपरी विधान सभा, स्वप्नील जेवळे सचिव भोसरी विधान सभा, चांद मुलाणी सदस्य, विजय अब्बाड उपाध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पिंपरी चिंचवड, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

WhatsAppShare