‘आम्ही सत्तेला लाथ मारु’; शिवसेनेच्या विधानाला राष्ट्रवादीकडून श्रध्दांजली

107

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – अखेर शिवसेना भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याची घोषणा केली आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून सतत एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेने भाजपने युती केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने  बॅनरबाजी करत ‘आम्ही सत्तेला लाथ मारु’ या वाक्यालाच आदरांजली वाहिली आहे.

भाजपशी युती करताच शिवसेनेचे राजीनामा खिशात, सत्तेला लाथ मारु या वाक्यांची आठवण करुन देत सोशल मीडियावर टोले लगावण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’ या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. शिवसेना भवन आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हे बॅनर लावले आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युती करत असल्याची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपला २५, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती करण्यात आली आहे.