आम्ही फक्त झेंडा बदलला, पक्षाची भूमिका मात्र तिच आहे

128

औरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाअधिवेशनात पक्षाचा झेंडा बदलला. त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. औरंगाबादमध्ये आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी बोलताना त्यांना पक्षाचा झेंडा बदलल्या बाबत विचारण्यात आले.

त्यावर बोलताना ते म्हणाले, आम्ही फक्त झेंडा बदलला, मात्र पक्षाची भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकार, बांगलादेशींना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. तर मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी देखील आम्हीच गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.

WhatsAppShare