आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दापोडीतील उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन

68

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी येथे बुद्ध विहाराशेजारील मोकळ्या जागेमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माई काटे, माजी नगरसेवक विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राउत, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, सुनील नरोटे, उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.

दापोडीतील बुद्ध विहाराशेजारी सुमारे २.९३ एकर क्षेत्रावर उद्यान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी ९३ लाखांहून अधिक खर्च येणार आहे. या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, टॉयलेट ब्लॉक, सुरक्षारक्षक क्वॉर्टर, ओपन स्टेज व गजेबो यासंह अनेक सुविधा असणार आहेत. या उद्यानाचे काम एक वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे.