आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते रहाटणी, थेरगाव भागातील बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

144

चिंचवड, दि. १३ (पीसीबी)   – भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत रहाटणी आणि थेरगाव, डांगे चौक परिसरातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भोजन देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या योजनेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांसाठी ही मध्यान्ह भोजन योजना सुरु करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक बाबा त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नगरसेविका सुनिता तापकीर, सविता खुळे, अर्चना बारणे, निता पाडाळे, माया बारणे, झामाबाई बारणे, प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, संदीप नखाते, संदीप गाडे, विनोद तापकीर, संजय मरकड, जिल्हा कामगार समिती सदस्य जयवंत शिंदे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, संतोष बारणे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम बारणे, राज तापकीर, दिपक जाधव, नरेंद्र माने,  राणी कौर व  बांधकाम कामगार उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते नोंदित बांधकाम कामगारांना सेफ्टी कीट, पाणी बॉटल, चटई, मच्छरदाणी, जेवणाचा डबा, व्यक्तिमत्व विकास पुस्तक संच  तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. एकूण ३ हजार ५०० कामगारांना या योजनेचा लाभ झाला. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी परिश्रम घेतले.