आमदार महेश लांडगे यांचा पिंपरी चिंचवड शहरातील १० हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन ‘आधार’ देण्याचा संकल्प

193

 

पिंपरी, दि.५ (पीसीबी) – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमधील सुमारे १० हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन ‘आधार’ देण्याचा संकल्प केला आहे. ‘एक हात मदतीचा’या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी आपआपल्या परिने गरजवंत नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. गरजवंत नागरिकांना तांदूळ, डाळी, तेल, गव्हाचे पीठ, मीठ-मसाले अशा स्वरुपात मदत करण्यात येणार आहे.

शहरात एकाच दिवशी (शनिवारी) नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे. चार वायसीए रुग्णालयातील आणि दोनजण खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, आपण आतापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गरजू नागरिकांना मदत करीतच आहोत. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या सहकार्याने आम्ही शहरातील १० हजार कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने आमची ‘टीम’ कामाला लागली आहे. मात्र, नागरिकांनीसुद्धा सहकार्य केल्यास आम्हाला अधिकाधिक कुटुंबांना मदत देता येईल. त्यासाठी ‘पुन्हा एक हात मदती’चा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. कारण, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. त्यावेळी आम्ही ‘एक हात मदतीचा’ असे आवाहन केले होते. आता पुन्हा एक हात मदतीचा.. अशी विनंती आम्ही नागरिकांना करीत आहोत. नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू (फक्त किरणा) मदत म्हणून द्याव्यात. मदत करण्यासाठी डॉ. निलेश लोंढे (मो. 9881572395), संजय पटनी (मो. 9822217163) आणि विनय रावळ (मो. 9689917031) यांची संपर्क साधावा, असे आवाहन आम्ही करीत आहे.

 

WhatsAppShare