आमदार महेश लांडगेंच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात

413

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार महेश लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड शहर मुस्लीम महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रमजाननिमित्त भोसरीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात सोमवारी (दि. ११) रोजा इफ्तार पार्टी उत्साहात झाली. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुस्लिम बांधवांनी मौलाना फिरोज अझिझी, मौलाना आझाद, मौलाना मारुफ, मौलाना अबरार यांच्या बरोबर नमाज पठण केले. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नितीन काळजे, माजी महापौर व भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, नगरसेवक सागर गवळी, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, तुषार हिंगे, विलास मडेगिरी, संतोष लोंढे, वसंत बोराटे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, भीमाबाई फुगे, कुंदन गायकवाड, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, भीमराव शिंगाडे, दिनकर ओताडे, फजल शेख, झिशान सय्यद, अजहर खान, संदीप बेलसरे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.