आमदार बाळा भेगडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ   

344

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मावळ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेले आमदार बाळा भेगडे यांना मंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली आहे. आमदार भेगडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. भेगडे हे पुणे जिल्ह्यातील भाजपचे  एकमेव भाजप मंत्री असणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज (रविवार) झाला. या विस्तारात पूर्वी पुणे जिल्ह्यातून मंत्री असणारे गिरीश बापट हे लोकसभेत विजयी झाले आहेत. तर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू  देण्यात आला आहे. त्यामुळे बाळा भेगडे हे जिल्ह्यातील एकमेव भाजप मंत्री  आहेत.

बाळा भेगडे  मावळ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.  त्याचबरोबर  पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष तसेच महाराष्ट्र भाजप सचिव पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. आता त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव करण्यात आमदार भेगडे यांनी मोलाची कामगिरी केली आहे.  यामुळेच भेगडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे चर्चा सुरू झाली आहे.