आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

92

ठाणे, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संतपरंपरेचा अवमान केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह केले होते. त्यामध्ये त्यांनी संतांचा अवमान केला आहे, शिवाय संत तुकाराम महाराज यांच्या खून झाला होता, संत चोखा मेळा यांचा उल्लेख जाणीव पुर्वक चोखा महार असा जातीवाचक केला, असे विविध आरोप आध्यात्मिक समन्वय आघाडीने केले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राची सांस्कृतीक आणि आध्यात्मिक अस्मिता लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांचे त्वरीत निलंबन करावे. तसेच त्यांना जाहीर माफी मागण्याचे आदेश द्यावेत, असेही पत्रात लिहिण्यात आले आहे.