आमच्या ‘मुल्क’शी असलेले नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर

194

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाकडे वाटचाल करत असणाऱ्या माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्याविषयी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भारत- पाकिस्तान संबंध सुधारण्याचा मानस मनाशी बाळगणाऱ्या इम्रान यांना सदिच्छा दिल्या आहेत.

गुरुवारी पाकिस्तानमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खान यांनी भारत- पाकिस्तान संबंधाविषयी वक्तव्य करत भारतासोबत संबंध सुधारण्याचा माझा प्रयत्न असेलच तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यालाच अधोरेखित करत ऋषी कपूर यांनी आपल्या ‘मुल्क’ या आगामी चित्रपटाचा दाखला देत एक ट्विट केले.

‘अगदी बरोबर म्हणालात तुम्ही इम्रान खान. किंबहुना गेल्या दोन दिवसांपासून भारत- पाकिस्तान संबंधांविषयी जे मी माध्यमांसमोर बोलत होतो तेच तुम्हीही बोलला आहात. मी आशा करतो की तुमच्या मुल्कचे माझ्या मुल्कसोबतचे नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळेल’, असे ट्विट त्यांनी केले.